रस्ता खोदल्यानंतर दुरुस्ती बंधनकारक

Foto
रस्ता खोदल्यानंतर दुरुस्ती बंधनकारक
रस्ता पूर्ववत न केल्यास ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा इशारा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरात गॅस, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा वाहिनीच्या कामांसाठी रस्ते खोदून ते तसेच उघडे सोडणाऱ्या ठेकेदारांना महापालिका प्रशासनाने मोठा शॉक दिला आहे. रस्ता खोदल्यानंतर तो तातडीने व सुस्थितीत पूर्ववत न केल्यास बीपीसीएलसह संबंधित संस्थांना दिलेले 'ना हरकत प्रमाणपत्र' रद्द करण्यात येईल, असा थेट इशारा महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिला आहे.
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने ९९ लाख रुपयांच्या निधीतून खड्डे बुजविण्याच्या कामांना सुरुवात केली आहे. यात अमरप्रीत ते मोंढा नाका या मुख्य व वर्दळीच्या मार्गावरील खड्डे 'डीएलसी' काँक्रिटीकरणाचा वापर करून बुजवले जात असल्याची माहिती बुधवारी (दि. १२) प्रशासनाकडून देण्यात आली. शहरात गॅस, ड्रेनेज तसेच पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी विविध रस्ते खोदले जातात. हे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांकडून रस्ते पूर्ववत
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर
केले जातात. मात्र अनेक ठिकाणी हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ता खोदण्याची परवानगी देतानाच त्यानंतरची दुरुस्ती व्यवस्थित करून घेण्याची जबाबदारी वॉर्ड अभियंत्यावर निश्चित करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
बुधवारी रस्त्यांच्या दुरवस्थेचा आढावा घेताना आयुक्त येडगे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. प्रत्येक वॉर्डातील खड्ड्यांची मोजणी करून पॉटहोल यंत्रांची मागणी यांत्रिकी
विभागाकडे नोंदवावी. यांत्रिकी विभागाने उपलब्ध यंत्रांचे नियोजन करून शहरातील विविध भागांतील खड्डे तातडीने बुजवावेत, असे आदेश त्यांनी दिले. तसेच शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे प्राधान्याने दुरुस्त करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेने अमरप्रीत ते मोंढा नाका या मार्गावरील खड्डे डीएलसी टाकून बुजवण्याचे काम सुरू केले आहे. तर हिमायत बाग परिसरातील खड्डा नुकताच बुजविण्यात आला आहे. पुढील कामे रखडू नयेत, यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांनी पॉटहोल यंत्रांचे आगाऊ नियोजन करून ठेवावे, असेही आयुक्तांनी सांगितले. यात महापालिकेची ना हरकत घेतल्यानंतर
संबंधित कंत्राटदाराने वॉर्ड अभियंत्याला पूर्वकल्पना देऊनच काम सुरू करावे. ना हरकत घेऊन तीन महिन्यांच्या आत काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई केली जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता व्यवस्थित दुरुस्त करून देण्याची जबाबदारीही संबंधित कंत्राटदाराचीच राहणार आहे. तर पाणीपुरवठा अथवा अन्य कामांसाठी खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती निकृष्ट झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची छायाचित्रे घेऊन तातडीने अहवाल सादर करावा. रस्त्याची दुरुस्ती रुस्ती समाधानकारक न करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी अधिका-यांच्या बैठकीत दिल्या आहेत. प्रत्येक निविदेच्या संचिकेसोबत काम सुरू करण्यापूर्वी आणि काम पूर्ण झाल्यानंतरची रंगीत छायाचित्रे जोडणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. चुकीची अथवा प्रत्यक्ष कामाशी विसंगत छायाचित्रे जोडल्याचे आढळल्यास संबंधित अभियंत्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
वर्दळ असलेल्या रस्त्यांना प्राधान्य
शहरातील खड्डे बुजविण्यासाठी २९ लाख रुपयांचे काम सुरू करण्यात आले आहे. वॉर्डनिहाय खड्‌ड्यांची मोजणी करून पॉटहोल यंत्राच्या साहाय्याने दुरुस्ती केली जाणार आहे. नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या प्रमुख रस्त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
यंत्रांचे आगाऊ नियोजन करा
खड्डे बुजविण्याचे काम यंत्राअभावी स्खड्डू नये, यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांनी पॉटहोल यंत्रांचे आगाऊ नियोजन करून ठेवावे. यांत्रिकी विभागाने उपलब्ध यंत्रांचे योग्य नियोजन करून शहरातील विविध भागांतील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने पूर्ण करावे, असे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले.